आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ : उपमुख्यमंत्र्यांची घोषणा


Ajit Pawar मुंबई :  कोविडकाळात मतदारसंघात थांबलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी बुधवारी केली. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

आमदारांना मिळणार पाच कोटींचा निधी
प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार असून आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारातही पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



आमदारांच्या चालकाला आता 20 हजार रुपये पगार
राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटींची घसघशीत वाढ करण्यात आली असून चार कोटी असलेला आमदारांचा स्थानिक विकास निधी आता पाच कोटी रुपये असणार आहे तर आमदारांच्या चालकाचा पगार 15 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार रुपये करण्यात आला आहे.

विकासकामे करण्यासाठी होणार निधीची मदत
विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार असून या नव्या निर्णयानुसार आता आमदारांना या निधीतून आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. विधानसभेतील आमदारांची संख्या 288 तर विधान परीषदेचे 78 आमदार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये दोन वर्ष वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !