भुसावळातील शिवशक्ती, हुडको कॉलनीत पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ

माजी नगरसेवक रमेश नागराणी व पुष्पा बत्रा यांच्या प्रयत्नांना यश


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये येणार्‍या शिवशक्ती कॉलनी व हुडको कॉलनी भागात आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. माजी नगरसेवक रमेश नागराणी व माजी नगरसेविका पुष्पा बत्रा यांच्या प्रयत्नानंतर होत असलेल्या कामामुळे या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वीच या परीसरात रस्त्यांची कामे झाल्यानेही नागरीकांनी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रभाग क्रमांक 21 मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, उद्योजक मनोज बियाणी, निक्की बत्रा, अजय नागराणी, अजय बढे, गिरीश महाजन, धर्मा देवकर, मंगेश पाटील, सुनील सोनवणे, बंटी सोनवणे, अरुण धांडे, रेखा सोनवणे, धमाळे व प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !