संथगतीने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने करा

कार्यकारी अभियंता निकम यांना वरणगावातील भाजपा पदाधिकार्‍यांचे साकडे


वरणगाव : शहरासाठी भाजपाच्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली मात्र कंत्राटदार अतिशय संथगतीने काम करीत असून विकास कॉलनी व प्रतिभानगर येथील टाकीचे काम सुरू करण्यात आलेली नाही शिवाय पाईप-लाईन टाकण्याचे काम संथगतीने सुरू आहे. या संदर्भात दखल घेवून तातडीने कामाला गती द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता निकम यांच्याकडे भाजपा पदाधिकार्‍यांनी केली.

भोगावती नदीच्या प्रदूषणाची तक्रार
यावेळी शहरातील जलशुद्धीकरण केंद्राचे तसेच पवन नगर, शिवाजी नगर, नारीमळा येथील टाकीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार करण्यात आली शिवाय भोगावती नदीत वरणगाव शहरातील संपूर्ण सांडपाणी सोडण्यात येत असल्याने भोगावती नदी प्रदूषित झाली असून नदीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील सांडपाणी हे नदीत न येऊ देता प्रकल्पापर्यंत गटारी करून नेण्यात यावे अन्यथा भाजपा भोगावती बचाव आंदोलन उभारेल तसेच या संदर्भात बैठक लावावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी केली. यावेळी उपकार्यकरी अभियंता किरंगे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !