रावेरात जुगाराचा डाव उधळला : सहा जणांना अटक


रावेर : शहरातील चावडी चौकात जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून रावेर पोलिसांनी धाड टाकून सहा जुगारींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तीन हजार 660 रुपयांची रोकड व तीन मोबाईल मिळून सात हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सुरेश मेढे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी शेख इकबाल शेख इमाम (इमामवाडा, रावेर), शेख रउफ शे.बाबू (उटखेडा रोड रावेर), सुरेश शालिक शिरतूरे (पंचशील नगर, रावेर), प्रवीण पुरणानंद गजरे (आंबेडकर नगर, रावेर), शेख शकील शे.हकीम (रसलपूर), शेख ईस्माईल शे.अमीर (रसलपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी साडेआठ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी शहरातील चावडी चौक, प्रकाश दलाल यांच्या घराजवळ जुगार खेळत असल्याची माहिती रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली. ही कारवाई सुनील कदम, विजू जावरे, एएसआय ईस्माईल, सुरेश मेढे, योगेश चौधरी, विकास पहुरकर, तुषार मोरे आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !