फैजपूरातील 29 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या


फैजपूर : शहरातील कारखान्याजवळील जीवराम नगरातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आला. युवराज रवींद्र चव्हाण असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

गळफास घेत तरुणाची आत्महत्या
फैजपूर शहरातील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळील जीवराम नगरात युवराज रवींद्र चव्हाण हा वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी नऊ वाजता तो घरात एकटा असतांना त्याने राहत्या घराच्या छताच्या अँगलला साडी बांधून गळफास घेतला. फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश वंजारी हे घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनाकरीता यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला. डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयांना सोपवला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !