फैजपूर प्रांत कार्यालय स्थलांरीत करण्याच्या हालचाली


स्थलांतर न करण्यासाठी प्रांताधिकारी थोरबोले यांना सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचे निवदेन

फैजपूर : महाराष्ट्र शासनाने फैजपूर शहरात सात वर्षापूर्वी प्रांताधिकारी कार्यालय मंजूर केले होते व कार्यालय फैजपूर शहरातील नगरपरीषदेच्या जागेत सुरू आहे. शहरातील प्रांत कार्यालय सावदा येथे स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू असले हे कार्यालय स्थलांतरीत होऊ नये या मागणीचे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन दिले. रावेर, यावल या दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी फैजपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून प्रांताधिकारी कार्यालय बसस्थानकापासून जवळच आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या फैजपूर शहरात रावेर-यावल तालुक्यातील जवळपास पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तसेच न्यायालयीन कामकाजासाठी व विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी व आपल्या परीसरातील समस्या मांडण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालय सर्वांना सोयीचे ठरते तसेच फैजपूर शहर हे दोन्ही तालुक्याच्या दृष्टीकोनातून सर्व वर्गाला उपयोगी शहर आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतांना प्रांताधिकारी कार्यालय सावदा येथे स्थलांतरीत करण्यामागचे कारण काय? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. े हे कार्यालय फैजपूर येथेच रहावे यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन दिले.

नगरपरीषद जादा जागा देण्यास तयार
प्रांताधिकारी कार्यालयासाठी आणखी जागा हवी असल्यास फैजपूर नगरपरीषद पहिल्या मजल्यावरील आणखी काही खोल्या देण्यास तयार आहे तसेच या व्यतिरीक्त आणखी जागा हवी असल्यास उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र कुठल्याही परीस्थितीत प्रांताधिकारी कार्यालय, सावदा येथे स्थलांतरीत होता कामा नये, अशी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी भुमिका घेतली आहे.

या पदाधिकार्‍यांचा समावेश
फैजपूर शहरातील प्रांताधिकारी कार्यालय स्थलांतरीत होवू नये यासाठी प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या सर्वपक्षीय निवेदनावर नगराध्यक्ष महानंदा होले, प्रभारी नगराध्यक्ष रशीद नसीर तडवी, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, भाजपा शहराध्यक्ष संजय पंडित रल, शिवसेना शहराध्यक्ष अमोल निबाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख अन्वर खाटीक, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, हेमराज चौधरी, वंचित आघाडीचे मनोज कापडे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, यांच्यासह व्यापारी, पत्रकार व पंचक्रोशीतील नागरीकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !