अ‍ॅड.रोहिणी खडसेंनी बंजारा समाज बांधवांसोबत धुलिवंदन केले साजरे


मुक्ताईनगर : तालुक्यातील जोंधनखेडा, टाकळी, मोरझिरा, बोरखेडा, उमरा या बंजारा तांड्या वर जाऊन माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या तीस वर्षा पासून बंजारा समाज बांधवांसमवेत धुळवड साजरी करीत होते तर त्यांचा कित्ता गिरवत जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा, टाकळी, मोरझिरा, बोरखेडा, उमरा या बंजारा तांड्यावर जाऊन बंजारा समाजबांधवांसमवेत धुळवड साजरी केली. यावेळी त्यांनी पारंपरीक बंजारा पोशाख परीधान करीत बंजारा भगिनी समवेत त्यांच्यासोबत पारंपरीक नृत्यही केले.

चोरीच्या तीन दुचाकींसह चोरटे जाळ्यात : जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी 

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, निलेश पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, पंचायत समितीचे माजी सभापती विकास पाटील, प्रदीप साळुंखे, तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, माजी सरपंच डॉ.बी.सी.महाजन, रणजीत गोयंका, नितीन कांडेलकर, राजु खंडेलवाल, शिवा पाटील, रवींद्र पाटील, संतोष कांडेलकर, रामू बोदडे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.



शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले : कासवेतील दोन सदस्य अपात्र


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !