भुसावळातील भोळे कॉलेजच्या मोहित यादवची राज्य बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड
भुसावळ- शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू मोहित अरुण यादव याची महाराष्ट्र राज्य शालेयस्तर बॉक्सिंग स्पर्धा औरंगाबादसाठी निवड झाली. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मोहित यादवचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ संजय डी.चौधरी, प्रा.अनिल सावळे आदी उपस्थित होते. मोहित यादव याने जळगाव जिल्हा व नाशिक विभाग बॉक्सिंग स्पर्धेत 56 किलोग्रॅम बॅनटम गटात विजय मिळविला. दरम्यान, 3 ते 07 नोव्हेंबर 2019 दरम्यान होणार्या राज्य बॉक्सिंग स्पर्धा, औरंगाबादसाठी त्याची निवड झाली आहे.


