यावल पालिकेच्या नूतन मुख्याधिकारीपदी मनोज म्हस्के
यावल : यावल नगरपालिकेत सोमवारी नूतन मुख्याधिकारी म्हणून मनोज म्हसे यांनी पदभार स्वीकारला. कर्मचार्यांच्या वतीने कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावल पालिका कर्मचारी एस.ए.शेख, शिवानंद कानडे, राजेंद्र गायकवाड, निकेतन बयाणी, स्वप्निल म्हस्के, योगेश मदने, सुनील उंबरकर, मधुकर गजरे, रफिक अहेमद, असदउल्ला खान, संतोष नन्नवरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने आता कामकाजातील अडचणी आता सुटण्यास मदत होणार आहे.


