श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव
फैजपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव आयोजित करण्यात आहे. यात 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कीर्तन प्रवचन व अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. यात गादिपती हभप दुर्गादास महाराज (नेहते )व गोपाळ महाराज विवरेकर, भाऊराव महाराज (मुक्ताईनगर), पराग महाराज चोपडे (भालोद), मुकेश महाराज (कळमोदा), उमेश महाराज मावळे (उदळी) हे उपस्थित राहतील. मठामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. उपस्थितीचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, सहसचिव विजय ढाके, खजिनदार योगेश भंगाळे, किशोर बोरोले, जयराम पाटील, विनायक गारसे, त्रंबक चौधरी, डिगू बजहाटे, भगवंत महाराज चौधरी, विजय महाजन रोझोदा, आशाबाई तळेले, गीता चौधरी, सोनू भंगाळे ,प्रहाद वाघूलदे, प्रमोद इंगळे, भास्कर इंगळे, चत्रभुुज खाचणे व गुणवंत नेमाडे यांनी केले आहे.


