फैजपूर शहरातील पांडुरंग रथोत्सव मोठया उत्साहात साजरा करा


महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : रथोउत्सवाबाबत पत्रकार परीषद

फैजपूर : ऐतिहासिक नगरीत संत श्री खुशाल महाराज देवस्थानचा अखंडीत 171 वा स्वयंभू पांडुरंग रथयात्रा महोत्सव मंगळवार, 12 रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी होत आहे. यानिमित्त 8 ते 17 नोव्हेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीद्वारा करण्यात आले आहे. हा रथोत्सव भव्यदिव्य आणि समाजाभिमुख होणेसाठी शहरवासीयांनी नुसते भाविक श्रोते होण्यापेक्षा आपण सर्वांनी तन-मन-धनाने या स्वयंभू पांडुरंग रथोउत्सवाला सहकार्य करावे, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी संत श्री खुशाल महाराज देवस्थान येथे नुकत्याच घेतलेल्या रथोउत्सव पत्रकार परीषदेत केले.

रथमार्गावर रांगोळ्या काढून करावे स्वागत
जनार्दन महाराज म्हणाले की, आपली फैजपूर नगरी ही संतांची पावन भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातच या शहरात स्वयंभू पांडुरंग रथोउत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच लवकरच या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम मंजूर झाले असून बांधकाम सुरू होणार आहे तसेच नागरिकांनी रथमार्गावर मोठ्या प्रमाणावर रांगोळ्या काढून रथाचे स्वागत करावे तसेच ज्यांना कुणाला अल्पोहार ठेवणे शक्य असेल त्यांनी ठेवावा, असेही ते म्हणाले.

अशी असणार रूपरेषा
8 ते 11 नोव्हेंबर नाम संकीर्तन सोहळा रात्री 8 ते 10 दरम्यान होईल तर 8 रोजी हभप आनंदा महाराज (मोताळा), 9 रोजी हभप दिलीप महाराज (शेगाव), 10 रोजी हभप रामेश्वर महाराज, 11 रोजी गोविंद महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सकाळी आठ ते नऊ अभिषेक व रात्री हभप मोहन महाराज (उस्मानाबाद) यांचे संकीर्तन सोहळा होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा स्वयंभू पांडुरंग रथयात्रा मिरवणुकीला प्रारंभ होईल तर दुपारी तीन वाजता महाआरती लोकप्रतिनिधींच्या हस्ते होईल तसेच सुभाष चौकात महाआरती संत गणांच्या हस्ते होईल. 13 रोजी श्री विठ्ठल-रुख्मिणी यांच्या पालखीची मिरवणूक, 14 रोजी पालखी मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा फैजपुू शहर व पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय व भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन रथ उत्सव समितीने केले आहे.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
या पत्रकार परीषदेस हभप प्रवीणदास महाराज, संतश्री खुशाल महाराज यांचे पाचवे वंशज हभप पुंडलिक महाराज, मेहुल भावसार, पांडुरंग सराफ, यादव भारंबे, नंदकिशोर सोमवंशी, सुनील गोवे, शालिग्राम पाटील, गिरीश नेमाडे, ऋषिल गोवे, जयेश राणा, नवल सरोदे, जयेश सरोदे, संतोष तांबट, आत्माराम भोंबे आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !