दिल्लीत झालेल्या मारहाणीचा भुसावळातील वकीलांकडून निषेध


भुसावळ : गत आठवड्यात तीस हजारी कोर्टाच्या आवारात दिल्ली पोलिसांकडून वकीलांना अमानुष मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ गोवा व महाराष्ट्र बार असोसिएशनने काळ्या कोटवर लाल फिती लावून निषेध करण्याच्या सूचना वकील संघाला दिल्याने बुधवारी भुसावळ तालुका वकील संघातर्फे मारहाणीच्या काळ्या फिती लावून निषेध नोंदववण्यात आला. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड.तुषार पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.धनराज मगर, सचिव अ‍ॅड.रम्मू पटेल, सहसचिव अ‍ॅड.पुरूषोत्तम पाटील, कोषाध्यक्ष अ‍ॅड.राजेश कोळी, कार्यकारणी सदस्य विजय तायडे, दीपक पाटील, विश्‍वंभर वाणी, वैशाली साळवे व इतर वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !