Sanjay Raut ईडीचा सर्वात मोठा धक्का : शिवसेना नेते संजय राऊतांची कोट्यवधींची प्रॉपर्टी जप्त


Sanjay Raut मुंबई : सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) शिवसेना संजय राऊत (Sanjay Raut) यांना मोठा धक्का देत त्यांची कोट्यवधींची प्रॉपर्टी जप्त केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अलिबागमधील संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावाने अलिबागमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीचे एकूण 8 प्लॉट ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती असून यासोबत संजय राऊतांचा दादरमधील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आला.



पत्राचाळ घोटाळ्यातून जमीन खरेदीचा संशय
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीनं मंगळवारी मोठी कारवाई करत संजय राऊतांना (Sanjay Raut) दणका देण्यात आला आहे. अलिबागमधील एकूण 8 प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीनं जप्त केला आहे. याचा संबंध संजय राऊत यांच्याशी आहे.

गोरेगाव घोटाळ्याची ईडीकडून चौकशी
गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा जवळपास 1034 कोटींचा आहे. याच घोटाळ्याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या अंतर्गत प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्ता याआधी जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नीशी निगडीत जागांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

चाळीसगावात 50 लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !