भुसावळातील दीनदयाल नगरातील अतिक्रमण हटवण्यापूर्वी पर्यायी जागा द्या


नगरसेवक पिंटू ठाकूर यांची मागणी : पालिका प्रशासनाला दिले निवेदन

भुसावळ : शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू झाल्याने उत्तर बाजूला असलेल्या दिनदयाल नगरातील 107 अतिक्रमित कुटुंबांच्या निवार्‍याची आधी व्यवस्था करावी, अशी मागणी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी भुसावळ मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर बाजूस दिनदयाल नगर वसलेले आहे. या दिनदयाल नगरातील 107 कुटूंबांची घरे या अतिक्रमणामध्ये येत आहे परंतु या 107 कुटूंबातील प्रमुख व्यक्ती हातमजुरी करणारे आहेत. 107 कुटूंब नगरपालिकेची नियमित घरपट्टी भरतात परंतु राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणामुळे दिनदयाल नगरमधील सर्व 107 घरे काढण्यात येणार असलीरत त्यांच्या निवार्‍याची अद्याप स्वतंत्र व्यवस्था झालेली नाही. जो पर्यंत या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था होत नाही किंवा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्यांना घरे मिळत नाही तोपर्यंत दिनदयाल नगर मधील कुटुंबियांना पालिकेने जागा उपलब्ध करून त्यांना त्या ठिकाणी मुलभूत सेवा सुविधांसहित निवारा बांधून देण्यात यावा, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !