बॅण्ड संयोजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करू


राज्याध्यक्ष विजयराजे खंडागळे : सावद्यात बॅण्ड कलाकार संयोजकांचा मेळावा

सावदा : बॅण्ड संयोजकांच्या अडी-अडचणी व समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र बॅण्ड उत्कर्ष कलाकार संघटनाच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करून व पाठपुरावा करून प्रश्न सोडवू, अशी ग्वाही सावदा येथे रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुका तसेच वरणगांव, बोदवड येथील शाखा उद्वघाटन व पदाधिकारी नियुक्ती प्रसंगी झालेल्या बॅण्ड कलाकार संयोजकांच्या मेळाव्यात अध्यक्ष व संघटनेचे राज्याध्यक्ष विजयराजे खंडागळे यांनी दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
मेळाव्यात सर्वप्रथम दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन विजयराजे खंडागळे व प्रमुख अतिथी राज्य सरचिटणीस भाऊसाहेब जगधने, जळगाव जिल्हाध्यक्ष शाम संदानशीव, जळगाव उपाध्यक्ष मोहन पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, सावद्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांनी व मान्यवरांनी केले. प्रास्ताविक जिल्हा संपर्कप्रमुख राजीव बोरसे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत विभागीय अध्यक्ष बबनराव बडगे, नीरज सोनवणे, सुरेश भालेराव, शे.अय्यूब शे.मासूम यांनी केले.

बॅण्ड वाहनांना परवान्यासाठी प्रयत्न
मार्गदर्शनात विजयराजे खंडागळे म्हणाले दोन बेस, दोन टॉप, दोन शार्पि लाईट वापरून आवाज मर्यादित ठेवावा तसेच आपण लवकरच मुख्यमंत्री, परीवहन मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री यांच्याकडे बॅण्ड वाहनांना इतर वाहनांप्रमाणे परवाना देण्यासंदर्भात विशेष बाब म्हणून शासनाकडून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शाम संदानशीव, प्रदीप पाटील, बबनराव बडगे, रफिक मास्टर, नितीन बूंदे, भाऊसाहेब लोंढे, किशोर लोखंडे, महेंद्र सोनवणे, नीरज सोनवणे, नितीन भालेराव, शिवा मास्टर, गजु लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील, अलीम भाई, मुनाफ मास्टर, अमोल गुरव, कमर खान, उमाकांत चौधरी, जामनेर तालुकाध्यक्ष सुरवाडे, शे.शकील मास्टर, आतीश केदारे, विलास सपकाळे, संदीप अवसरमल, विकास तायडे यांच्यासह बॅण्ड कलाकार मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गजुसर लोखंडे तर आभार आतिष केदारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व बॅण्ड संयोजकांनी व कलाकार यांनी परीश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !