शेतातील ठिबक नळ्यांना आग लावत पाईपांचे नुकसान
जळगाव : तालुक्यातील लमांजन येथील शेतकर्याच्या शेतातील ठिंबक नळ्या आणि पाईपाचे नुकसान करण्यात आले.
अज्ञातांनी केले नुकसान
जळगाव तालुक्यातील लमांजन येथील रहिवासी पुंडलिक दामू खामकर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे तालुक्यातील लमांजन शिवारातील गट नं. 150/3 आणि 166 मध्ये शेत आहे. शेतात पीक काढण्यात आल्यानंतर त्यांनी शेतातील ठिंबकच्या नळ्या शेतातच्या बांधावर गोळा करून ठेवलेल्या होत्या. गुरूवार, 14 एप्रिल रोजी सांयकाळी पाच वाजता शेतातील काम आटोपून पुंडलिक खामकर हे घरी आले.








