महालखेड्याच्या महिलेचा थ्रेशरमध्ये पदर अडकल्यामुळे मृत्यू
मुक्ताईनगर : शेतात ज्वारीची काढणी सुरू असतांना मशीनमध्ये ज्वारीची कणसे टाकताना पदर थ्रेशरमध्ये अडकल्याने गळफास लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना महालखेडा येथे शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता घडली. छाया संतोष वाघ (30, रा.महालखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. एएसआय प्रमोद चौधरी तपास करीत आहेत.


