अभियंता मुलाच्या अपघाती मृत्यू ; सुनेचा सासु-सासर्‍यांनी केला पुर्नविवाह

आमोद्यातील चौधरी परीवाराचा पुढाकार : रोझोद्यातील आदर्श विवाहाची सर्वदूर चर्चा


भुसावळ : मृत्यू अटळ असून ते शास्वत सत्यदेखील आहे. लग्नानंतर अवघ्या 47 दिवसानंतर तरुण अभियंता असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू ओढवल्याने आमोद्यातील चौधरी परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तर अकाली आलेल्या वैधव्यामुळे तरुण सुनेपुढेदेखील उभे आयुष्य जगण्याचा संघर्ष उभा राहिला मात्र सासरच्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीमुळे मुलीनेही सासर हेच माहेर मानले व सासरच्यांनी आई-वडिलांची भूमिका वठवत सुनेचा पुर्नविवाह करण्याचा निर्णय घेतला. 24 एप्रिल रोजी रोझोदा, ता.रावेर येथे झालेल्या या विवाहाची सर्वदूर चर्चा होत आहे.

बोदवड शहरातील मिरची कांडप कारखान्याला आग : 30 लाखांचे नुकसान 

तरुण अभियंत्याचा स्फोटात मृत्यू
शैलजा व किशोर मोतीराम चौधरी (मूळ रा.आमोदा, ता.यावल ह.मु.वापी, गुजरात) यांचा अभियंता असलेला मोठा मुलगा मयूर आणि कै.आशा व वसंत इच्छाराम महाजन (रा.खेडी, ता.रावेर, ह.मु.नाशिक) यांची कन्या शीतल सोबत 30 मे 2021 रोजी विवाह झाला मात्र लग्नानंतर अवघ्या 42 दिवसांत म्हणजेच 12 जुलै 2021 रोजी कंपनीत झालेल्या स्फोटात मयूर गंभीररीत्या जखमी झाला. उपचार घेताना 17 जुलै 2021 रोजी काळाने त्याच्यावर झडप घातली.

सासु-सासर्‍यांनी वठवली आई-वडिलांची भूमिका
47 दिवस सासरी राहिलेल्या शीतलला सासू-सासर्‍यांकडून मिळालेल्या प्रेमळ वागणुकीनंतर तिने माहेरी न जाता सासरीच थांबण्याचा निर्णय घेतला. सासू-सासर्‍यांनी तिला सून न मानता मुलीप्रमाणे वागणूक दिली. शीतलला विश्वासात घेऊन तिच्या पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. हा विवाह 24 एप्रिलला संगीता व रेवा भगवान धांडे (रा.रोझोदा, ता.रावेर) यांचा मुलगा भूषण (हेमराज) यांच्यासोबत पार पडला. या आदर्श विवाहाला जळगावचे विनय भास्कर पाटील, पालघरचे उमाकांत पुरुषोत्तम लोखंडे, भुसावळचे मनोज पंडित पाटील, आमोद्यातील भागवत दामोदर पाटील, भोजराज लोखंडे, हितेश बोंडे (फैजपूर) यांचे अनमोल सहकार्य लाभले.

केरळातील मूळ रहिवासी असलेल्या विवाहितेची दीपनगरात आत्महत्या 


कॉपी करू नका.