मालपूरात शेत रस्त्याच्या वादातून शेतकर्‍याचा खून : आठ संशयीतांविरोधात गुन्हा


अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील एका 47 वर्षीय प्रौढाचा शेत रस्त्याच्या वादातून खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रभाकर विनायक पाटील ( 47, रा.मालपूर, ता.अमळनेर) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शेत रस्त्याच्या वादातून केला खून
याप्रकरणी मारवड पोलिसात उज्वलाबाई प्रभाकर पाटील (35, मालपूर, ता. अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार, 19 रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास मालपूर शिवारात त्यांचे पती प्रभाकर पाटील हे शेतात जाणार्‍या गाड रस्त्यावर मुरुम टाकण्याचे काम करीत होते. यावेळी मुरुम टाकण्याच्रूा कारणावरुन व जुन्या भांडणाचे कारणावरुन गावातील ज्ञानेश्वर लहू पाटील, राजेंद्र लहू पाटील, दिलबर लहू पाटील, रुपेश ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी भगवान पवार, लहू यादव पाटील, सुनंदा राजेंद्र पाटील, निर्जला राजेंद्र पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना लाकडी काठ्यांनी मारहाण करुन गंभीर दुखापत केली व या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मारवड पोलिसांनी धाव घेत मृतदेह रात्री 9.30 वाजता मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी भेट दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !