सावद्यात आदिवासी तडवी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांचे शुभमंगल
सावदा : सावदा शहरातील आदिवासी सेवा मंडळ (आसेम) या संस्थेतर्फे दरवर्षी सावदा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदादेखील सोहळ्याचे आयोजन येथील नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. मेळाव्यात आठ जोडप्यांचे विवाह झाले. यंदा सोहळ्याचे 27 वे वर्ष होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी युवा नेते धनंजय चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रावेर लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील, सावदा येथील युवा नेतृत्व सीमरन वानखेडे, माजी उपनगराध्यक्षा नंदाबाई लोखंडे, कामील तडवी, संजू जमादार तडवी, नजमा तडवी, आलिशना तडवी (न्हावी), राजू तडवी (मुक्ताईनगर), मुबारक उखर्डू तडवी (कुसूंबा), राजू मुशीर तडवी (मालोद), फारुख तडवी (जळगाव) यांच्यासह विविध क्षेत्रातील व समाजातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.


सामूहिक विवाहाने खर्चात बचत
धनंजय चौधरी म्हणाले की. आदिवासी तडवी समाज मेहनती समाज असून साधाभोळा आहे. या समाजाने सामूहिक विवाह आयोजित करून समाजातील गोरगरीब कुटुंबाचा मोठा खर्च वाचविला आहे. श्रीराम पाटील यांनीदेखील या कार्यक्रमाचा गौरव केला व येणार्या काळात या समाजासाठी मी सदैव उभा राहील, अशी ग्वाही दिली. सीमरन वानखेडे व नंदाबाई लोखंडे यांनीदेखील आपले विचार यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमानंतर कुतबा व नमाज पठण होऊन विवाह सोहळा झाला. गेल्या 27 वर्षात आसेम या संस्थेतर्फे 1836 जोडप्यांचे सामूहिक विवाह या माध्यमातून लावण्यात आले आहे, दरम्यान शिरीष चौधरी यांची कार्यकर्मस्थळी सकाळी भेट दिली व आसेमच्या कार्यकर्त्यां सोबत येथील पिरमंजन शहा बाबा दर्ग्यावर चादर चढविली.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी आसेम अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी, आसेम सावदा शहराध्यक्ष मायकल तडवी, आमद चांदखा तडवी, मुबारक तडवी (वाघोदा) यांच्यासह आसेमचे सर्व जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.