यावल तालुक्यात शाळेत आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


यावल : यावल तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या 17 शाळेत तब्बल 130 जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 मेपर्यंत पालकांना ऑनलाईन शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज हे रद्द ठरवण्यात आले असून राज्य शासनाच्या बदलानुसार पुन्हा आता नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने सुरुवात
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर गेल्या मात्र शासन निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवली जात आहे. यावल तालुक्यात 17 शाळा या आरटीई प्रवेशासाठी पात्र असून यात 130 विद्यार्थी प्रवेश घेतात. या शाळेत प्रवेशासाठी आरटीईचे ऑनलाईन अर्ज पालकांनी करावे यासाठी 31 मे पर्यंत मुदत आहे. पूर्वीच्या पालकांनी अर्ज केले असतील तर ते रद्द ठरवण्यात आले असून नव्याने अर्ज करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !