भुसावळचा संघ समूहगान स्पर्धेत ठरला अव्वल
भुसावळ- भारत विकास परीषदेतर्फे रविवारी शहरातील प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या प्रांतस्तरीय ‘चेतना के स्वर’ समुहगान स्पर्धेत भुसावळ शाखेच्या के. नारखेडे विद्यालयाच्या संघाने प्रथम, जळगाव शाखेच्या संघाने द्वितीय तर औरंगाबाद संघाने तृतीय क्रमांक मिळवला. ‘भारत को जानो’ या स्पर्धेत जळगाव संघ प्रथम व औरंगाबाद संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारा संघ क्षेत्रीय पातळीवर अहमदाबाद येथे होणार्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
स्पर्धेनंतर विजेत्यांना पारीतोषिक वितरण
भारत विकास परिषद देवगिरी प्रांतातर्फे शहरातील प्रभाकर हॉलमध्ये रविवारी प्रश्नमंजूषा स्पर्धा व राष्ट्रीय समूहगान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेनंतर करण्यात आले. प्रांतस्तरीय चेतना के स्वर समूहगान स्पर्धेत भुसावळ शाखेच्या के. नारखेडे विद्यालयाच्या संघाने प्रथम मिळवला. तर भारत को जानो या स्पर्धेत जळगाव संघ प्रथम व औरंगाबाद संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे तर प्रमुख पाहूणे म्हणून क्षेत्रीय सचिव सचिन गांजबे उपस्थित होते. स्पर्धेत लातूर, नांदेड, औरंगाबाद, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ येथील शाखांनी सहभाग नोंदवला. या वेळी प्रांत अध्यक्ष तुषार तोतला, प्रांतसचिव योगेश मांडे, आयोजक शाखा भुसावळच्या अध्यक्षा डॉ. निलिमा नेहेते, चेतना के स्वर स्पर्धेचे संयोजक रमाकांत भालेराव, संयोजक उज्ज्वल चौधरी, सचिव उज्ज्वल सराफ, कोषाध्यक्ष सुनील इंगळे, उपाध्यक्षा डॉ. मनीषा दावलभक्त, विलास फालक, डॉ.अर्चना खानापूरकर, संघटक सचिव भूषण वाणी आदींनी सहकार्य केले.



