रावेरच्या उपनगराध्यक्षपदी सादिक शेख यांंची बिनविरोध निवड


रावेर- रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सादिक शेख यांची नगरपालिकेच्या विशेष सभेत बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रावेर नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपनगराध्यक्षपदासाठी सादिक शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी देवगुणे यांनी केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहंम्मद, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगरसेवक प्रल्हाद महाजन, असदुल्लाखा, अ‍ॅड.सुरज चौधरी, राजेंद्र महाजन, आसीफ मोहंमद, जगदीश घेटे, संगीता अग्रवाल, पार्वताबाई शिंदे, संगीता महाजन, शारदा चौधरी, रंजना गजरे, संगीता वाणी, हमीदाबी पठाण, ललिता बर्बे, शेख नुसरत यास्मिन कलिम आदी उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष शेख यांंचा सत्कार
रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सादिक शेख निवड झाल्यानंतर छोटेखानी सत्कार कार्यक्रम झाला. यात नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सादिक शेख यांचा सत्कार नगराध्यक्ष दारा मोहम्मद, शिरीष वाणी, अ‍ॅड.योगेश गजरे, राजेंद्र महाजन, मुन्नाभाई अग्रवाल, दिलीप शिंदे आदींनी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !