शिक्षण, सामर्थ्य, प्रेरणा देण्याचे स्व.देवीप्रसाद शर्मा यांचे सदैव कार्य


प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह : सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळ : स्वतःसाठी कधीही अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजासाठी समाजकार्य करण्यात आपले आयुष्य स्व.देवीप्रसाद शर्मा (बेबा भैय्या) यांनी खर्च केले. त्यांनी उदात्त मनाने इतरांना शिक्षण, सामर्थ्य, प्रेरणा देण्याचेच काम केले, त्यांचा हा सामाजिक कार्याचा विचार घेवूनच आपणा सर्वांना पुढे जायचे असल्याचे प्रतिपादन हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी स्व. देवीप्रसाद शर्मा (बेबा भैय्या) यांच्या सहाव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

स्व.बेबा भैय्या सदैव स्मरणात
धार्मिक व सामाजिक प्रवृत्ती जोपासून, शैक्षणिक मूल्यतत्वातून समाजाची सेवा करणारी माणसे अभावानेच जन्माला येतातते म्हणूनच ते आपल्या सदैव आठवणीत राहतील, अशी भावना सुद्धा प्राचार्य सिंह यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य, दुर्बल कष्टकरी, शेतकरी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हिंदी सेवा मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची दारे खुली करून दिल्याने समाजसुधारणेत स्व. देवीप्रसाद शर्मा (बेबा भैय्या) यांचे मोठे योगदान आहे, अशी भावना डॉ.जे.पी.सुचिक यांनी व्यक्त केली. भैयाजींचा सहाव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सोमवार, 11 नोव्हेंबर रोजी श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. कार्यक्रमप्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधुलताजी शर्मा, उपाध्यक्ष सत्यनाराणजी गोडयाले, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी, व्यायामशाळा चेअरमन पंकजजी संड, किर्ती संड, स्कूल कमेटी चेअरमन रमेशजी नागराणी, नंदकुमार अग्रवाल, संजय नाहटा, सुरजित सिंग गुजराल, संजय जोशी तसेच हिंदी सेवा मंडळाचे सर्व सभासद, अकडेमीक डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा.सुधीर ओझा, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ.पंकज भंगाळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील तसेच हिंदी सेवा मंडळ संचलित सर्व महविद्यालय व विद्यालय यांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !