खिरोदा प्र.रावेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुणाबाई पाटील


रावेर- खिरोदा प्र.रावेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरुणाबाई प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पार्वताबाई महाजन यांनी राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या पदावर बुधवारी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी एकमेव उमेदवारी अर्ज आलेल्या अरुणाबाई पाटील यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. या विशेष बैठकीला उपसरपंच गुलशान तडवी, ग्रामपंचायत सदस्य सुनील महाजन, संगीता महाजन, पार्वताबाई महाजन, आत्माराम पाटील, अतुल महाजन, शालुबाई सोनवणे उपस्थित होते. खरेदी विक्री संघ चेअरमन पी.आर. पाटील, वामन पाटील, सीताराम महाजन, विजय पाटील, सुरेश पाटील, सुभाष पाटील, रुबाब तडवी, वसंत पाटील, सतीष पाटील, नितीन पाटील, निवृत्ती पाटील, ग्रामसेवक भालेराव आदीनी नवीन सरपंच पाटील यांचे अभिनंदन केले. अरुणाबाई या मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पत्नी आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !