जितेंद्र कुरकुरे यांचा रेल्वे महाप्रबंधक एस.के.मित्तल यांनी केला सन्मान
भुसावळ : सतर्कतेशी संबंधीत क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याने मुंबई येथे झालेल्या सतर्कता जागरूकता सप्ताहात भुसावळ येथील मुख्य कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक जितेंद्र टी.कुरकुरे यांना मध्य रेल्वे महाप्रबंधक एस.के.मित्तल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्र कुरकुरे यांनी बोगस कुटुंब निवृत्ती वेतन व स्थलांतर भत्ता केस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य सतर्कता अधिकारी तथा वरीष्ठ उपमहाप्रबंधक एस.के.पंकज, मुख्य कार्मिक अधिकारी ए.के.सिन्हा आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुरकुरे यांना वेळोवेळी वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे व कार्मिक अधिकार्यांचे मार्गदर्शन लाभले.


