भुसावळात घरफोडी : पावणेतीन लाखांच ऐवज लंपास


भुसावळ : शहरातील मोहंम्मदी नगरात घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल दोन लाख 90 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. 9 एप्रिल ते 11 नोव्हेंबरदरम्यान ही चोरी झाली. मोहंमदी नगरातील रहिवासी तथा ठेकेदार मोहंमद शाहनवाज मो.जफरखान हे बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरामागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे दागिने, घरातील टीव्ही, मोबाईल, प्रवासी बॅग, ओव्हन, पाच घड्याळे, एसी, 15 चेकबुक असा एकूण दोन लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. दागिन्यांमध्ये 44 ग्रॅम वजनाचा गळ्यातील हार, कानातील टॉप्स, 15 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. चोरीची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब किर्तीकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, श्वानाला पाचारण केल्यानंतर श्‍वान घराच्या परीसरात घुटमळल्याने चोरट्यांचा माग काढता आला नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !