रावेर तालुक्यातील तीन गावे सौभाग्य योजनेपासून वंचित
रावेर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी सुरू केलेल्या ‘सहज बिजली हर घर योजना सौभाग्य’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महावितरणच्यावतीने 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ऊर्जामंत्री ंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्याच्या प्रयत्नशीलमुळे त्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्यावतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविणे बंधन कारक आहे मात्र रावेर तालुक्यातील तीन आदिवासी गावे या योजनेपासून वंचित असल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
कायम खंडित वीजपुरवठ्यातील घरांचाही योजनेत समावेश
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थींना ही वीज जोडणी विना:शुल्क देण्यात येते. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक असलेतरी थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेली सुध्दा अनेक घरे या सौभाग्य योजनेत आहेत. दरम्यान, सौभाग्य मार्फत आदिवासी भागातील तीन गावांना एकही कनेक्शन नाही.

129 ग्राहकांनी वीज बिल भरलेच नाही
रसलपूर येथील महाविरणचे साहाय्यक अभियंता मोहोम्मद अवैस शेख म्हणाले की, सौभाग्य योजनेमार्फत आम्ही दिलेल्या 221 वीज कनेक्शनपैकी 129 वीज ग्राहकांनी वीज कनेक्शन घेतल्यापासून अद्याप बिल भरलेले नाही. दरम्यान, योजनेच्या प्रचार-प्रसारात रसलपूर कक्ष पूर्णपणे उदासीन असल्याचा आरोप होत आहे.


