भुसावळातील प्रभाग चारच्या जागेसाठी पोटनिवडणूक


भुसावळ- भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक चारच्या रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरूझाली असून यासाठी प्रारुप मतदार यादी करण्यासाठी नगरपालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. प्रभाग चारमधील भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यावर 6 ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या जागेवर तसेच प्रभाग 24 मधील रीक्त अशा दोन्ही जागेंवरही पोटनिवडणूक घेण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठवला होता मात्र या प्रस्तावानुसार जिल्हा प्रशासनाकडून नगरपालिकेला 7 नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक चारमधील मतदान यादी प्रारूप करण्यात याव्या, असा आदेश प्राप्त झाला आहे. या प्रारूप मतदार यादीवर 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या तर 20 नोव्हेंबरला प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, 22 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार असून 23 रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल तर 25 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

शहरातील प्रभाग 24 ची अधिसूचना नाही
प्रभाग क्रमांक 24 मधील नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी जात प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्यामुळे त्यांना 23 जुलैला जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले तर या निकालास चार महिने झाले तरीही या प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून कोणतीही अधिसूचना जाहीर झालेली नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !