खिर्णीपुरात घरफोडी : 23 हजाराची ऐवज लंपास


यावल : शहरात खिर्णीपुरा भागात मध्यवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवार सकाळी उघडीस आला असुन 8 हजाराच्या रोकड सह 23 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. शहरातील बुरूज चौकाच्या पुढे खिर्णीपुरा परिसर आहे येथे मध्यवस्तीत शेख जुबेर शेख मुन्नंवर यांचे घर आहे. त्यांचे कुटुंबीय गुरूवारी भिवंडी येथे नातेवाईकाकडे लग्नात गेले होते. तर घरी शेख जुबेर घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते तेव्हा सकाळी ते झोपेतुन उढून खालील रूम मध्ये आले तेव्हा त्यांना घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व सर्व साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. तेव्हा त्यांनी कपाटात ठेवलेली आठ हजाराची रोकड तपासुन पाहिली असता ती नव्हती तसेच कपाटात 4 ग्रम सुमारे 15 हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी देखील मिळून आली नाही तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी करीत 8 हजारांच्या रोकड सह 23 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याचे स्पष्ट झाले असुन मध्यवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन पोलीस प्रशासनाबद्दल देखील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !