भुसावळ रनर्सतर्फे उद्या‘धावपटूंसाठी स्ट्रेचिंगचे महत्व’ विषयावर व्याख्यान


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स अससोसिएशनतर्फे रविवार, 17 रोजी शहरातील “रागिणी हॉल, ताप्ती क्लब’ येथे ’धावपटूंसाठी स्ट्रेचिंगचे महत्व’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट डॉ.प्रियंका अय्यर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता राहतील. डॉ.प्रियंका अय्यर यांनी ’स्पोर्ट्स फिजिओथेरपी’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्या सध्या डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्यांना ’ऐरोबिक व फिटनेस’ या विषयात अधिकृत शिक्षक म्हणून मान्यता आहे. शिवाय जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी ’फिजिओथेरपीस्ट’ म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे . त्याचप्रमाणे त्यांना महाराष्ट्राच्या 30 व्या पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी त्या अधिकृत फिजिओथेरपीस्ट होत्या. सदरचा कार्यक्रम धावपटूंसाठी पर्वणी असून याचा लाभ सर्व धावपटू व नागरीकांनी घ्यावा,  असे आवाहन संयोजिका डॉ .चारूलता पाटील व अध्यक्ष प्रा.प्रविण फालक यांनी केले आहे . त्याआधी 6:30 वाजता रेल्वे अधिकारी कॉलनीतून भुसावळ रनर्सचा संडे स्पेशल रन आयोजित केला आहे. या रनला भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्य प्रबंधक विवेककुमार गुप्ता हिरवी झेंडी दाखवतील. या रनमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जी.आर.अय्यर यांनी कळविले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !