दापोरा गावातील महिलेचा मृत्यू : चौघांविरोधात गुन्हा


जळगाव : दापोरा येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी सोमवार, 23 मे रोजी रात्री चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
प्रमिलाबाई दिलीप सोनवणे (57, दापोरा, ता.जि.जळगाव) या महिलेच्या मृत्यूप्रकरणी संशयीत अशोक रमण नाईक, मंगलसिंग हिलाल सोनवणे (दोन्ही रा.दापोरा, ता.जि.जळगाव), ज्ञानेश्वर प्रकाश मालचे (रा.जळगाव) आणि रमेश सुदाम मोरे (शिरसोली, ता.जि.जळगाव) यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

मारहाणीत झाला महिलेचा मृत्यू
बुधवार, 18 मे रोजी दापोरा गावात एका ठिकाणी लग्न होते. लग्नासाठी जळगाव येथील ज्ञानेश्वर प्रकाश मालचे हे कार क्रमांक (एम.एच.19 डी.वाय.4713) ने आले. त्यावेळी त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा अरुण हा ओट्यावर बसला असताना घरासमोरून कार जात असतांना अज्ञात दुचाकीधारकाने कारला कट मारला व पसार झाला. अरूणनेच कारला कट मारल्याचा गैरसमजूतीतून अशोक रमण नाईक, मंगलसिंग हिलाल सोनवणे (दोन्ही रा.दापोरा, ता.जि.जळगाव), ज्ञानेश्वर प्रकाश मालचे (रा.जळगाव) आणि रमेश सुदाम मोरे (रा.शिरसोली, ता.जि.जळगाव) यांनी अरूणला मारहाण केली व वाद सोडवण्यासाठी अरुणची आई प्रमिलाबाई, भाऊ विजय आणि विजयची पत्नी प्रियंका हे आवराआवर करण्यासाठी आले. तिघांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई सोनवणे ह्या दगडावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असतांना रविवार, 22 मे रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पारोळा तालुक्यात अपघात : वधू पिता टँकरच्या धडकेत ठार 


कॉपी करू नका.