रावेर खरेदी विक्री संघात ज्वारीसह बाजरी व मक्याची खरेदी होणार


रावेर : खरीप हंगामात येणार्‍या ज्वारी, बाजरी, मक्याचे खरेदी करण्याची व ऑनलाईन मुदत खरेदी विक्री संघातर्फे निश्चित करण्यात आली आहे. रावेर तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नाव नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खरीप हंगामातील शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी, मक्याची उपअभिकर्ता संस्था म्हणून रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी ज्वारी, बाजरी व मका खरेदीची ऑनलाईन मुदत सोमवार, 18 पासून 31 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ज्वारी, बाजरी व मक्याच्या खरेदीसाठी आधार कार्डची झेरॉक्स, बँक पास बुकची झेरॉक्स, शेतकर्‍यांचा मोबाईल नंबर व ज्वारी, बाजरी व मका या पिकाची ऑनलाईन नोंद असलेला चालु वर्षाचा 7/12 उतारा सादर करावयाचा आहे. खरेदीसाठी शासकीय हमी भाव ज्वारीला दोन हजार 550 रुपये प्रती क्विंटलप, मका एक हजार 760 प्रती क्विंटल तर बाजरी दोन हजार प्रती क्विंटल प्रमाणे आहे. शासनाने वरील दर हे एफएक्यु दर्जाच्या धान्यासाठी निश्चित केले आहे. शेतकर्‍यांनी ऑनलाईन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील व मॅनेजर विनोद चौधरी यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !