पिंप्राळा भागात जुना वाद उफाळला : कुटुंबियांना मारहाण
जळगाव : जुन्या वादातून तरुणासह पत्नी आणि आईची दगडाने मारहाण केल्याची घटना शहरातील पिंप्राळा परीसरातील सिद्धार्थनगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
सिद्धार्थ नगरात शुभम संजय पवार हा तरुण आई व पत्नी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. याच परीसरात राहणारे विक्की रवींद्र बाविस्कर याच्यासह चार जणांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून शुभम त्याची पत्नी व आईला शिविगाळ करत मारहाण केली. या दरम्यान एकाने शुभम याच्या आईच्या कपाळावर दगड मारून दुखापत केली तसेच चाकुने फाडून टाकेल, अशी धमकी दिली. या घटनेत शुभमच्या आई वर्षा संजय पवार या जखमी झाल्या आहेत. शुभमच्या तक्रारीवरून विक्की रवींद्र बाविस्कर, राजू वसंत निकम, आकाश रवींद्र बाविस्कर व उषा रवींद्र बाविस्कर या एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.


