दररोज धावल्याने कार्यक्षमतेसोबतच दिवसभर राहतो उत्साह


डॉ.प्रियंका अय्यर : भुसावल रनर्सतर्फे धावपटूंसाठी स्ट्रेचिंगचे महत्व विषयावर व्याख्यान

भुसावळ : दररोज धावल्याने कार्यक्षमता वाढण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून असतो त्यामुळे धावणे आवश्यक असल्याचे मत फिजिओथेरपिस्ट डॉ.प्रियंका अय्यर यांनी व्यक्त केले. भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे धावपटूंसाठी ‘स्ट्रेचिंगचे महत्व’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.अय्यर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विभागाचे मुख्य रेल्वे प्रबंधक विवेककुमार गुप्ता व निता गुप्ता उपस्थित होत्या.

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या -डॉ.अय्यर
डॉ.अय्यर यांनी धावपटूंनी धावण्याच्या आधी व धावल्यानंतर कोणता व्यायाम करणे आवश्यक आहे शिवाय कोणत्या प्रकारचे अन्न सेवन करावे याविषयी मार्गदर्शन केले तसेच धावताना कसे धावावे व विविध प्रकारच्या संभाव्य इजा कशा टाळाव्यात याचे प्रात्यक्षिकासह उपस्थितांचे विविध शंकांचे निराकरण करण्यात आले तसेच धावताना व दैनंदिन जीवनात पाणी पिण्याचे प्रमाण आपली कार्यक्षमता कशी वाढवते याविषयी देखील त्यांनी विविध दाखले देत उपस्थितांना अधिकाधिक पाणी प्यावे असा सल्ला दिला. सुरुवातीस भुसावळ रनर्सचे प्रमुख प्रवीण फालक व कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ.चारुलता पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्सचे कार्य गौरवास्पद -डीआरएम
विवेक कुमार गुप्ता यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे कार्य प्रशंसनीय असून भुसावळ शहरात साधारणतः 50 ते 60 टक्के रेल्वे अधिकारी व कर्मचारी असून त्याचा प्रत्यक्ष लाभ रेल्वेला देखील होत आहे. धावण्यामुळे कार्यक्षमता वाढून आपणास दिवसभर उत्साह जाणवतो शिवाय लवकरच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी देखील भुसावळ रनर्स सोबत बहुसंख्येने धावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रसंगी मध्य रेल्वे आयोजित रन फॉर युनिटी कार्यक्रमात सहभागी भुसावळच्या धावपटूंना विवेककुमार गुप्ता व निता गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या धावपटूंचा सन्मान
याप्रसंगी प्रवीण फालक, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, प्रवीण वारके, स्वाती फालक, गणसिंग पाटील, पूनम भंगाळे, स्नेहल चौधरी, अर्चना भगत, पूनम कुलकर्णी, अंकित पोद्दार, विजय पाटील, चारुलता अजय पाटील, अजय पाटील, श्रीकांत नगर नाईक, तृप्ती नगर नाईक, अशोक पाटील ,अखिलेश कनोजिया, प्रवीण पाटील या धावपटूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार डॉ.नीलिमा नेहेते यांनी मानले. पहाटे साडेसहा वाजता गुप्ता यांच्या हस्ते झेंडी दाखवून ‘रन विथ डीआरएम’ या स्पेशल रनला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पी. सी.चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
पाच किलोमीटरच्या या रनमध्ये स्वतः गुप्ता यांच्यासोबत स्टेशन संचालक जी.आर.अय्यर, सी.समंतराय, एल.एस.बघेल, चंद्रकांत कदम, दीपक कुमार, अरुण कुमार, शंकर, दत्ता, निखील, मोहन चौधरी, मुकेश चौधरी, एसफबी.फिरके या अधिकारी वर्गाने देखील सहभाग नोंदवला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजीत खरारे, सचिन अग्रवाल, अमित अग्रवाल, ब्रिजेश लाहोटी, तरुण बिरीया, आर.एस.ठाकूर, विलास पाटील, संजय भटकर, प्रा. गिरीश कुलकर्णी, हेमंत इंगळे, योगेश मांडे यांनी सहकार्य केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !