माजी मंत्री सुरेश जैन यांना तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा लागलेल्या माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई हायकोर्टाकडून अंतरीम दिलासा मिळाला असून वैद्यकीय कारणांकरीता तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन आणि पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. सप्टेंबर महिन्यात सुरेश जैन यांनी कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती.
