भुसावळ रनर्स उद्या धावणार दक्षिण आफ्रिकन ‘कॉम्रेड रनर’ सोबत


भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू शुक्रवारी, 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.45 वाजता रेल्वे क्रीडांगणापासून दक्षिण आफ्रिकन ‘कॉम्रेड रनर’ सतीश गुजरन यांच्यासोबत धावणार आहेत. रन पूर्ण झाल्यानंतर सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत रेल्वे क्रीडांगणावर सतीश गुजरन उपस्थित धावपटू व नागरीकांना मार्गदर्शन करतील व उपस्थितांच्या शंकांचे निराकरण करतील. सतीश गुजरन हे मूळचे उडप्पी मॅगलोर येथील असून ‘रन विथ सतीश’ या कार्यक्रमाचे सहसंस्थापक आहेत. ‘नेटवर्क-21’ या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक असलेले सतीश दक्षिण आफ्रिकेतील अतिशय अवघड व जगप्रसिद्ध अशी 90 (नव्वद) कि.मी.ची ‘कॉम्रेड रन’ लागोपाठ 10 वर्षे पूर्ण करणारे एकमेव भारतीय आहेत. विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ते कुठलेही वाहन न वापरता धावत जात त्या ठिकाणी पोहचतात, अशीही त्यांची ख्याती आहे. यातून ते पर्यावरणाच्या संरक्षणाचा संदेश देत असतात. एका आंतरराष्ट्रीय धावपटूसोबत धावण्याची व त्यांना ऐकण्याची संधी भुसावळतील धावपटूंना व नागरिकांना आहे, या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक व समन्वयक प्रवीण वारके यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !