भुसावळात रेल्वे तिकीटांची काळ्याबाजारात विक्री : आरोपीला अटक
भुसावळ : रेल्वे तिकीटांची काळ्या बाजारात विक्री करणार्या एका संशयीताला रेल्वे तिकीट तपासणींच्या पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या ताब्यातून पुण्यासह मुंबई जाण्याची तीन हजार 25 रुपये किंमतीची चार तिकीटे जप्त करण्यात आली. सलीम बागवान हनीफ बागवान (ग्रीन पार्क, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई सीटीआय ए.एस.राजपूत, सीटीआय एच.डी.सावकारे, योगेश पितांबर घुले, ललित टोके, डी.आर.सोनवणे व सीआयबीच्या पथकाने केली.


