जळगावात 50 वर्षीय इसमाची आत्महत्या


जळगाव : शहरातील भिलपुरा चौकीजवळील रहिवासी प्रमोद लालचंद दायमा (50, रा. भिलपुरा चौकीजवळ, शनीपेठ ) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चारवाजता उघडकीस आली. मृत्यूपूर्वी ‘मेरे कर्म और स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया देंगे, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून दायमा यांनी आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. दायमा हे त्यांचे नातेवाईक डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्या आयुर्वेदीक दवाखान्यात औषधी बनवायचे काम करीत तर पत्नी राजश्री मेहंदी आर्टिस्ट आहे. ऑर्डर मिळेल त्यानुसार त्या मेहंदी काढून देण्याचे काम करतात. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !