भुसावळातील हुडको भागातील 140 घरांचे कंटेनर सर्वेक्षण
भुसावळ : शहरात डेंग्यूचा वाढलेला फैलाव पाहता पालिका प्रशासनाकडून कंटेनर सर्वेक्षणावर भर दिला जात आहे. शनिवारी मिरची ग्राऊंड परीसरातील हुडको कॉलनीतील 19 वर्षीय तरुणी मुस्कान प्रकाशलाल डिंगरिया हिचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर शनिवारी न्यू हुडको भागात आरोग्य विभागाच्या पथकाने भेट देवून 140 घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले तसेच मृत मुस्कान प्रकाशलाल डिंगरिया यांच्या परीवारातील 11 सदस्यांच्या रक्तनमुन्यांचे अहवाल घेण्यात आले. दरम्यान, न्यू हूडको, मिरची ग्राऊंड परिसरातील तब्बल 140 घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले. यापैकी दहा घरांमधील कंटेनर दूषित्त आढळून आले.
डास असलेले कंटेनर नष्ट
हुडको कॉलनी भागातील दूषित आढळलेल्या कंटेनरमध्ये अळ्या व डेंग्यूचा फैलाव करणार्या एडीस इजिप्ती या डास असल्याने तेे कंटेनर नष्ट करण्यात आले. डिंगरिया परीवारातील तरुणीचा बळी गेल्यानंतर हूडको परीसरात भीतीचे वातावरण आहे. यासोबतच या परीवारातही भीती असल्याने परीवारातील 11 सदस्यांच्या रक्त नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. डॉ.नृपाली सावकारे, आरोग्य सहाय्यक सुनील महाजन, आरोग्य सेवक प्रशांत चौधरी, ज्ञानदेव चोपडे यांनी डिंगरिया परिवाराचे सांत्वन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय नागराणी उपस्थित होते.



