सावखेडा खुर्दच्या शेतकर्‍याची नैराश्यातून आत्महत्या


निंभोरा : जवळच असलेल्या सावखेडा खुर्द येथील प्रमोद हरी बखाल (35) या शेतकर्‍याने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. शेतीवर उदरनिर्वाह करणार्‍या बखाल यांची सहा महिन्यांपूर्वी उभी असलेली केळीची बाग उउद्धस्त झाल्याने त्यांना लाखोंचा फटका बसला तर त्यानंतर त्यानी शेतात कपाशी लावली मात्र अवकाळी पावसाने पांढर्‍या सोन्यालाही फटका बसला व नातेवाईकांची देणीदेखील देता येत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सोमवार, 25 रोजी दुपारी  राहत्या घरी पंख्याला दोरी बांधून फाशी घेतल्याची घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी लगेचच त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.एन.डी.महाजन यांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ असा परीरवार आहे. शवविच्छेदन डॉ.स्वप्नीषा पाटील यांनी केले. अधिकल तपास सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, देवेंद्र पाटील, युसूफ तडवी करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !