भुसावळात भीम आर्मी भारत एकता मिशनचे ‘जोडे मारो आंदोलन’


पतंजलीची उत्पादने बंद करण्याची मागणी : पोलिसांनी बॅनर्ससह प्रतिमा घेतली ताब्यात

भुसावळ : बाबा रामदेव यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून पतंजलीचे उत्पादने बंद करावीत या प्रमुख मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे सोमवारी दुपारी 12 वाजता गांधी पुतळ्याजवळ रामदेव बाबा यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी फ्रेस असलेले रामदेव बाबा यांची प्रतिमा असलेले बॅनर्स ताब्यात घेतले. भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून रामकृष्ण यादव उर्फ रामदेव बाबा यांच्या निषेधार्थ सोमवारी गांधी पुतळ्याजवळ पदाधिकार्‍यांनी निदर्शने केली. यावेळी पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रामदेव बाबा यांचा निषेध केला. यावेळी यावल, बोदवड, कपील नगर, रावेर, वराडसीम, भुसावळ येथील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

गांधी पुतळ्याजवळ आंदोलन
तलाठी कार्यालयापासून घोषणाबाजी करीत आंदोलक यांनी गांधी पुतळा गाठला, गांधी पुतळ्या समोर आंदोलकांनी निदर्शने करीत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना वाहतूकीला अडचण येणार नाही, अश्या पध्दतीने रस्त्यातून बाजूला केले. यावेळी घोेषणाबाजी करीत आंदोलकांनी रामदेव बाबा याच्या बॅनरला पदाधिकारी, कार्यकत्यांनी जोडो मारो आंदोलन केले. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व त्यांच्या सहकार्‍यांनी उपस्थितांकडून बॅनर हिसकावले. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह आरसीपी प्लॉटून, होमगार्ड, पोलिस कर्मचारी यांचा बंदोबस्त चोख ठेवला होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !