भुसावळातील अल्पवयीन तरुणीला पळवले : आरोपी जाळ्यात


भुसावळ : शहरातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी संशयीत आरोपी आकाश गणेश पाटील (22, रा.शिवपूर कन्हाळा रोड, नारायण नगर,भुसावळ) याच्याविरुध्द भुसावळ बाजारपेठ पोलिसात 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यानंतर आरोपी तरुणीसह पसार झाला होता. 25 रोजी आरोपी राहत्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध पोस्को हे कलम वाढवण्यात आले असून आरोपीची दुचाकीदेखील जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली आरोपीला अटक
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार वाल्मीक सोनवणे, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, तुषार पाटील आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !