A young woman who was going to her sister’s wedding ceremony died in a train journey पुण्याला बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या राजस्थानच्या तरुणीचा रेल्वे प्रवासात मृत्यू


A young woman who was going to her sister’s wedding ceremony died in a train journey पाचोरा : राजस्थानच्या तरुणीचा रेल्वे प्रवासात प्रकृती खालावल्याने पाचोरानजीकच्या गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. वाघिषा संजय पोतेदार (25) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजस्थानच्या कोटी येथील वाघिषा ही तरुणी पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी संपर्क क्रांती एक्स्प्रेसने निघाली होती मात्र प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने तिचा पाचारोनजीक मृत्यू झाला. याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ईडी कार्यालयात हजर ; काँग्रेसचे देशभर आंदोलन

रेल्वे प्रवासात खालावली प्रकृती
कोटा (राजस्थान) येथील रहिवाशी तसेच फरीदाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीस असलेली वाघिषा संजय पोतेदार (25) ही बुधवार, 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजुन 30 मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन 12630 कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसने (डब्बा नंबर बी- पाचच्या सीट क्रमांक एक) वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. बर्‍हाणपूर-भुसावळ दरम्यान वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसीन घेतली. मात्र रेल्वे एक्स्प्रेसही जळगांव ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान वाघिषा हिची प्रकृती अधिकच खालावली. गुरुवार, 21 जुलै रोजी पहाटे 3 वाजुन 30 वाजता संपर्क क्रांती एक्स्प्रेसला पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली.

उपचारापूर्वीच तरुणीचा मृत्यू
घटनेची माहिती पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोराचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आरपीएफ पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र वाघिषा हिची प्राणज्योत मालवली होती. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी एकच हंबरडा फोडला.

पाचोरा पोलिसात नोंद
घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चाळीसगावचे एपीआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

फुलगावजवळील अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे रास्ता रोको आंदोलन


कॉपी करू नका.