मुक्ताईनगरात अंगणवाडीतून साहित्याची चोरी : सहृदयी आमदारांनी नवीन साहित्य देत दूर केली गैरसोय


Theft of materials from Anganwadi in Muktainagar: Friendly MLAs removed the inconvenience by providing new materials मुक्ताईनगर : शहरातील अंगणवाडी क्रमांक एक (उर्दू शाळा क्रमांक दोन, सीड फार्म एरीया) मधील साहित्याची चोरीला गेल्याची तक्रार अंगणवाडी सेविका साधना पगारे यांनी पोलिस स्टेशन केल्यानंतर होणारी गैरसोय लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्व-खर्चाने अंगणवाडीमधून चोरीला गेलेल्या साहित्याची नवीन खरेदी करून अंगणवाडी पदाधिकार्‍यांना हे साहित्य शिवसेना महिला पदाधिकार्‍यांहस्ते सुपूर्द केले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आमदारांनी केलेल्या मदतीचे कौतुक करीत आभार मानले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना महिला पदाधिकारी कल्पना पालवे, जिल्हा संघटक सरीता कोळी, शहर संघटक यशोदा माळी उपशहर संघटक, ज्योती मालचे, सीमा पूजारी, नगरसेवक राजू हिवराळे, नगरसेवक निलेश शिरसाठ, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल पाटील, स्वप्नील श्रीखंडे, रवी दांडगे, जफर अली, शकील मेम्बर, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख भिकन, शरीफ तडवी , शाळा समिती अध्यक्ष रौफ मण्यार, अंगणवाडी सेविका साधना पगारे, मदतनीस सुरेखा महाजन आदी उपस्थित होत्या.

मेथी गावाजवळ तीन वाहनांच्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !