वरणगावात अपर तहसील कार्यालयासाठी शासन सकारात्मक : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


वरणगाव (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : वरणगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि परिसरातील ग्रामीण भागातील जनतेचा विचार करता महसूल विभागाच्या सेवा सुविधांसाठी भुसावळात जाणे-येणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने या संदर्भात शासनाकडे अपर तहसील कार्यालय होण्या संदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जिल्हा दौर्‍यावर आलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रविवारी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेट घेवून पुन्हा याबाबत पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी अपर तहसील कार्यालय होण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे आश्वासन दिले.

लवकरच सुरू होणार अपर तहसील कार्यालय
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या माहितीनुसार, मुंबई भेटीत मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून वरणगावसाठी अपर तहसील कार्यालयाची आग्रही मागणी करण्यात आली व त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना वरणगावबाबत प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय स्तरावरून शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच शासनाची मंजुरी मिळेल व त्या संदर्भात मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आल्यानंतर त्यांनीदेखील या संदर्भात सकारात्मता दर्शवली. मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी डॉ.राजेंद्र फडके, नगरसेवक नाना चौधरी, सुनील माळी, आकाश निमकर, मिलिंद भईसे, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, भोजराज पालवे उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !