समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!


भुसावळ विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन : मान्यवरांनी दिला थोर पुरूषांच्या कार्याला उजाळा

भुसावळ : शहर व विभागात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांना स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून थोर पुरूषांच्या कार्याला उजाळा दिला.

माळी भवनात अभिवादन
शहरातील माळी भवनात महात्मा फुले यांना 129 वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भुसावळ माळी समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेच पूजन केले. मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. यावेळी मंडळाकडून विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. महात्मा फुले यांचे समाजकार्य पूर्ण समाजात बिंबविण्यासह फुले दाम्पत्यांना भारत रत्न पुरस्कार मिळवण्यासाठी स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. कैलास बंड, शैलेश माळी, रामकृष्ण माळी, योगेश महाजन, वरुण महाजन, निलेश भोपळे व मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.

कंडारी ग्रामपंचायत कार्यालय
तालुक्यातील कंडारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून प्रकाश मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. सामुहिक वंदन करण्यात आले. ग्रामसेवक प्रशांत तायडे, संदीप शिंगारे, सरजु तायडे, विनायक वासनिक उपस्थित होते.

मुक्ताईनगरात अभिवादन
मुक्ताईनगर-
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सकाळी मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकातील महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी या तीनही राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी जळगाव जिल्हा नियोजन समिती सदस्य मनोहर खैरनार, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख योगेश लोढे, गोपाळ सोनवणे, महेंद्र मोंढाळे, पंढरी पाटील, योगेश पाटील, जीवन पाटील, अर्जुन भोई, बिसमिल्ला बागवान, मुशीर मन्यार आदींची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !