भुसावळ ऑर्डनन्सच्या कर्मचार्‍याची आत्महत्या


भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत राहणार्‍या अरुण नाना मिसाळकर (55) यांनी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 7.15 वाजेपूर्वी घडली. अरुण मिसाळकर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमीक अंदाज आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तुकाराम शिंगटे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार अनिल चौधरी पुढील तपास करीत आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !