अनोळखी रेल्वे प्रवाशाची ओळख पटवण्याचे आवाहन


भुसावळ : अप 11016 कुशी नगर एक्स्प्रेसमध्ये 75 ते 80 वर्षीय अनोळखी इसमाचा 28 नोव्हेंबर रोजी मृत्यू ओढवला. दीर्घ आजाराने हा मृत्यू झाला असून अनोळखी इसमास चाळीसगाव रेल्वे स्थानकावर उतरवल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. अनोळखी इसमाची उंची पाच फूट चार इंच, रंग काळा-सावळा, दाढी व मिशी बारीक व पांढरी, अंगाता खाकी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व त्यावर मरुण रंगाचे चैन असलेले जॅकेट तसेच अंगावर ग्रेव पांढर्‍या रंगाची शाल असे वर्णन आहे. अनोळखी प्रवाशाबाबत ओळख पटत असल्यास चाळीसगावचे तपासी अंमलदार प्रकाश चाधरी (8830417598) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !