रेल्वे अधिकार्याची फेकरीत रेल्वेखाली आत्महत्या
फेकरी : भुसावळ येथील डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रूम मधील अधिकारी वैभव आत्माराम लभाणे (32, मुळ रा.संतोषीमाता वार्ड नं. 23, बलकरंगा, चंद्रपूर. ह.मु. राममंदिर वार्ड, एलआयसी कार्यालयाजवळ, भुसावळ) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना फेकरी रेल्वे डाऊन लाईनवरील रेल्वे खांबा कि.मी. 449/8 जवळ बुधवार, 4 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेचे वृत्त कळताच फेकरीचे पोलिस पाटील किशोर बोरोले यांनी तालुका पोलिस ठाणे व रेल्वे आरपीएफ यांना खबर दिली. त्यावरून रेल्वेचे अधिकारी सिनिअर डिओएम को, सिनिअर डिओएम एचडब्ल्यु, सिनिअर डिएन यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली. मयत लभाणे यांची स्कुटी रेल्वे लाईनच्या बाजूला जुन्या साकरी रोडवर लावलेली आढळली. मयत इसमाची ओळख त्याच्या खिशातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे झाली. तपास तालुका पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल प्रेम सपकाळे व त्यांचे सहकारी करीत आहेत.


